सकाळ डिजिटल टीम
पावस : सध्या पावस परिसरामध्ये हापूस आंब्याचे उत्पादन चांगल्याप्रकारे असल्यामुळे बाजारात दरही चांगला मिळत आहे.
उन्हामुळे झाडावरील आंबा काढण्यासाठी तयार होत आहे. तो काढण्यासाठी बागायतदार सरसावत आहेत.
आवक वाढल्यास बागायतदारांपुढे दर घसरण्याची भीती आहे. बदलत्या हवामानामुळे झाडांना नव्याने फूट होत असल्यामुळे यंदाचा आंबा हंगाम लांबण्याची शक्यता आहे.
सध्या या भागांमध्ये हापूस आंबा मोठ्याप्रमाणात बाजारात पाठवला जात असल्यामुळे दरही समाधानकारक आहे.
मुंबई, पुणे बाजारातील दलालांकडून पेटीला तीन हजार रुपये दर मिळत आहे. पेट्यांची आवक सध्या वाढत असल्यामुळे दर खाली येण्याची शक्यता वाढली आहे.
सुरुवातीला मोहोर आलेल्या झाडांवर सध्या हापूस आंबे लगडलेले पाहायला मिळत आहेत. सध्या बदलत्या वातावरणामुळे हापूस आंब्याच्या कलमांना मोठ्या प्रमाणात मोहोरही आलेला आहे.