सकाळ डिजिटल टीम
कोकण आणि घाटमाथा यांना जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटाला विविध कारणांनी विशेष महत्त्व आहे.
सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील हा घाट पावसाळ्यात पर्यटकांना नेहमीच साद घालतो.
यंदा सुरुवातीलाच समाधानकारक पाऊस झाल्यामुळे अणुस्कुरा घाटात निसर्गाने हिरवा शालू पांघरल्यासारखेच दिसत आहे.
नागमोड्या वळणाचा रस्ता धुक्यात हरवलेला असताना त्यामधून प्रवास करताना वेगळाच अनुभव येतो.
त्यामुळे अनेक पर्यटकांची पावले घाट परिसराकडे वळू लागली आहेत, तरीही पर्यटकांचा राबता कमी होत नाही.
पाचल येथील विनायक सक्रे यांनी टिपलेले अणुस्कुरा घाटातील हे निसर्गसौंदर्य आहे.