Saisimran Ghashi
आपली आवडती मॅगी आता कोरियन अंदाजात 5 मिनिटात तयार करा. ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे.
मॅगी, पाणी, कोरियन चिली पेस्ट, सोया सॉस, कांदा, लसूण, तेल, तीळ, गाजर (वैकल्पिक)
तुम्हाला हव्या त्या कंपनीचे नूडल्स आणा. नूडल्समध्ये पॅकेट उघडा आणि पाणी उकळून घ्या.
कढईत तेल गरम करून कांदा आणि लसूण कापून तळा.
तळलेले कांदा-लसूण आणि कोरियन चिली पेस्ट मिक्स करा.
उकळलेल्या पाण्यात मॅगी आणि मसाला टाका.
तळलेले मिश्रण आणि सोया सॉस मॅगीमध्ये मिक्स करा.
त्यामध्ये गाजर कापून टाका (वैकल्पिक) आणि सर्व काही चांगले मिक्स करा.
तुम्हाला आवडत असल्यास वरून तीळ,चिली फ्लेक्स टाका आणि गरमागरम सर्व्ह करा.