Vrushal Karmarkar
प्रत्येक विद्यार्थ्याचे किमान एकदा तरी भारतातील सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्याचे स्वप्न असते. भारतात दरवर्षी, IIT आणि अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेणारे 60% विद्यार्थी हे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी (CBSE) संलग्न शाळांमधील असतात.
सीबीएसई आणि यूपी बोर्डाशी संलग्न असलेल्या बहुतांश शाळा या शहरांमध्ये आहेत. अभ्यासक्रम, शिक्षणाचा दर्जा, शाळांच्या पायाभूत सुविधा, फी, स्थान, सुरक्षा या सर्व बाबी महत्त्वाच्या ठरतात.
मात्र जसे महाराष्ट्रातील पुण्याला विद्येचे माहेरघर म्हणतात, तसेच देशात एका शहराला शिक्षणाचा कारखाना म्हटलं जातं. तर हे शहर कोणतं?
भारतातील अनेक शहरांना त्यांच्या शिक्षण पद्धती आणी संस्थांमुळे एज्युकेशन हब म्हटले जाते. या प्रमुख शहरांपैकी एक म्हणजे राजस्थानमधील कोटा.
कोटा शहरातील कोचिंग इन्स्टिट्यूट देशभरात प्रसिद्ध आहेत. कोटा हे कोचिंग इन्स्टिट्युटचे केंद्र आहे.
यासाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी आयआयटी आणि जीईई तसेत नीटच्या तयारीसाठी येतात. कोटा शहरातील प्रमुख कोचिंग संस्थांमध्ये अॅलन, रेझोनन्स आणि बन्सल क्लासेसचा समावेश आहे.
कोटा शहराच्या संस्कृतीमुळे त्याला एज्युकेशन फॅक्टरी असे टोपणानाव मिळाले आहे. येथील कोचिंग संस्थांच्या यशाचे प्रमाण खूप जास्त आहे. ज्यामुळे ते विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय झाले आहे.
कोटा शहरात विद्यार्थ्यांसाठी विशेष वसतिगृह आणि पीजी सुविधा उपलब्ध आहेत.