अनिरुद्ध संकपाळ
भारतात दाखल होण्यापूर्वी इंग्लंड संघाचे ब्रँड ऑफ क्रिकेट बॅझबॉल चांगलेच चर्चेत आले होते. बॅझबॉल भारतात यशस्वी होणार की नाही याबाबत चर्चा सुरू होती.
भारताने हैदराबादमधील पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर तर बॅझबॉलबाबत एक वेगळीच हवा निर्माण झाली होती. मात्र पुढच्या दोन्ही कसोटीत रोहितच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने हा बॅझबॉल मोडून खाल्ला.
तिसऱ्या कसोटीतनंतर भारताचे माजी सलामीवीर कृष्णमचारी श्रीकांत यांनी इंग्लंडने उगाचच बॅझबॉलची हवा करून ठेवल्याचं वक्तव्य केलं.
श्रीकांत म्हणाले की, इंग्लंड संघ शक्य असतं तर आताच विमान पकडून मायदेशात परतला असता. मात्र त्यांना पुढचे दोन कसोटी सामने अजून खेळायचे आहेत.
इंग्लंडने बॅझबॉलची नुसती हवा करून ठेवली आहे. ते कुठं यशस्वी ठरलंय? अॅशेसमध्ये ठरलंय? जर ते असंच खेळत राहिले तर कोणतीच रणनिती यशस्वी ठरणार नाही.
त्यांना जर ते जे काही बोलत आहेत ते करून दाखवायचं असेल तर भारतात खेळताना लागणारे स्किल शिकणे गरजेचे आहे.