रोहित कणसे
जम्मू काश्मिर येथे विधानसभा निवडणुकीला सुरूवात झाली असून पहिल्या टप्प्याचे मतादान पार पडले, पण तुम्हाला माहितेय का १९९६ साली येथे निवडणुका होऊ शकल्या याचं मोठं श्रेय कुका पारेला याला जातं.
याचं कारण म्हणजे काश्मीर खोऱ्यात नव्वदीच्या दशकात दहशतवाद्यांनी मोहम्मद युसुफ उर्फ कुका पारे यांचा धसका घेतला होता.
त्याचं कारण म्हणजे, कुका पारे यांने पाकिस्तानात जाऊन दहशतवाद्यांच्या कॅम्पमध्ये प्रशिक्षण घेतलं आणि पुढे याच दहशतवादी संघटनांविरोधात मोर्चा उघडला.
इतकेच नाही तर कुका पारे याने स्वतःची ‘इखवान-उल-मुसलमीन’ नावाची दहशतवादी संघटना देखील स्थापन केली होती.
पाकिस्तानात प्रशिक्षण घेऊन आल्यावर काही दिवस याने दहशतवाद्यांसोबत काम केलं नंतर आत्मसमर्पन करून तो भारतीय सैन्याच्या बाजूने काम करू लागला.
१९९६ साली निवडणुकांमध्ये सहभागी होण्यासाठी राजकीय पक्ष समोर येत नव्हते तेव्हा कुका पारेनं स्वतःच ‘जम्मू अँड काश्मीर आवामी लीग’ नावाने राजकीय पक्ष स्थापन केला.
काश्मिरात पार पडलेल्या या लोकसभा निवडणुकीत कुका पारेच्या पक्षाचे सर्वच्या सर्व उमेदवार पराभूत झाले.
विधानसभा निवडणुकीत पुन्हा पक्षाचे सर्वच्या सर्व उमेदवार पराभूत झाले पण यावेळी कुका स्वतः निवडून आला आणि आमदार झाला.
पुढे सप्टेंबर २००३ मध्ये ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांनी कुका पारेची गोळ्या झाडून हत्या केली.
Yashasvi Jaiswal जगात दुसरा; मोडला विराट कोहलीचा भारी विक्रम