सोशल मीडियावर कुल्हड पिझ्झाची क्रेझ, वाचा सीक्रेट रेसिपी

साक्षी राऊत

कुल्हड पिझ्झा

पिझ्झाचे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. पिझ्झाची आवड लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना असते. पिझ्झाची वाढती मागणी बघून मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पिझ्झा तुम्हाला बघायला मिळतील.

Kulhad Pizza Recipe

पिझ्झा प्रसिद्ध कसा झाला?

पिझ्झा त्यावेळी पॉप्युलर झाला जेव्हा अम्बर्टो-१ आणि क्वीन मार्गारिटा नेपल्स दौऱ्यावर गेले होते. तेव्हा त्यांनी तेथील स्थानिक लोकांना असे काही बनवण्यास सांगितले जे नवे असेल. तेव्हा राफेल एस्पोसिटोने त्यांच्यासाठी तीन पिझ्झा बनवले.

Kulhad Pizza Recipe

कुल्हड पिझ्झा म्हणजे काय?

कुल्हड पिझ्झा सोशल मीडियावरील व्हायरल रेसिपींपैकी एक आहे. या पिझ्झामागील कॉन्सेप्ट जालंधरमधील एका जोडप्याची होती.

Kulhad Pizza Recipe

कुल्हड पिझ्झासाठी किती वेळ लागतो?

या पिझ्झाच्या तयारीसाठी २५ मिनिटे लागतात. तर शिजवण्यास १५ मिनिटे लागतात.

Kulhad Pizza Recipe

यासाठी लागणारे साहित्य

पिझ्झा ब्रेड, शिमला मिर्ची, बारीक कापलेले कांदे, अर्धा कप पनीर, गाजर, चीझ अर्धा कप, चाट मसाला, ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स, टोमॅटो सॉस, स्वीट कॉर्न आणि काळी मिर्ची.

Kulhad Pizza Recipe

बनवण्याची पद्धत

कुल्हड पिझ्झा बनवण्यासाठी सगळ्यात आधी पिझ्जा बेसचे छोटे छोटे तुकडे करून घ्या. आता यावर कापलेली पत्ता गोबी, शिमला मिर्ची, कापलेले गाजर, आणि पनीरचे तुकडे घालून सजवा.

Kulhad Pizza Recipe

स्टेप १

आता यावर मीठ, काळे मीठ, चाट मसाला आणि सॉस घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. आता कुल्हडमध्ये मसाला घाला. आणि कापलेल्या भाज्या घाला.

Kulhad Pizza Recipe

स्टेप २

त्यावर आता स्वीट कॉर्न घालून कुल्हड तयार करून घ्या. आता ओव्हन २०० डिग्रीवर सेट करून घ्या.

Kulhad Pizza Recipe

स्टेप ३

कुल्हडला १० मिनिटे बेक करा. आता वरून यावर चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो घालून गरम गरम सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kulhad Pizza Recipe