Anuradha Vipat
‘कुमकुम भाग्य’ फेम अभिनेता अभिषेक मलिक सुहानी चौधरीशी घटस्फोट घेणार असल्याचं समोर आलं आहे.
नुकत्याचं दिलेल्या मुलाखतीत अभिषेक म्हणाला, “हा. हे खरं आहे. सुहानी आणि मी विभक्त होतं असून आम्ही आमच्या आयुष्यात पुढे जात आहोत.
यावर पत्नी सुहानी चौधरी म्हणाली, “आम्ही जेव्हा एकत्र राहू लागलो तेव्हा मला कळालं की, आमच्यात बरेच मतभेद आहेत. आता आयुष्यात पुढे जायला पाहिजे, याची जाणीव आमच्या दोघांना झाली आहे.
अभिषेक व सुहानीचं ऑक्टोबर २०२१ मध्ये दिल्लीत मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा झाला होता.
लग्नापूर्वी दोघं एकमेकांना नऊ महिने डेट करत होते. २०१२ साली अभिषेकने ‘छल – शह और मात’ या मालिकेतून हिंदी मालिकाविश्वात पदार्पण केलं होतं.
आता वैवाहिक जीवनातील समस्यांमुळे दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.