Anuradha Vipat
अभिनेता कुशल बद्रिके याने एक खास पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.
काही खास फोटो कुशलने शेअर केले आहेत
या पोस्टमध्ये कुशल बद्रिकेने सुखी जीवनाचा मंत्र सांगितला आहे.
'हिंदी शोमध्ये काम करणं म्हणजे आयुष्यात आलेली सगळ्यात मोठ्ठी संधी' असं काही मला वाटत नाही असं पोस्ट कुशलने पोस्टमध्ये लिहिल आहे
तसेच पुढे माझा 'अमोल पणशीकर' नावाचा मित्र मला कायम म्हणतो, स्वतःच कॅनव्हास मोठं कर म्हणजे चित्र काढायला मजा येईल आणि ते रंगवायलाही!अशी पोस्ट कुशलने शेअर केली आहे
म्हटलं एकदा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. खूप वेगळा आणि खूप चांगला अनुभव आला. नवीन मित्र मिळाले, नवीन शिकायला मिळालं, असंही कुशलन त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पुढे एक गोष्ट अनुभवली, आयुष्याला रंगत येण्यासाठी अख्खं आभाळ रंगवायची गरज नाही. माणसाला स्वतःपुरतं इंद्रधनुष्य होता आलं की, पुरेसं होतं, असं म्हणत कुशलने सुखी जीवनाचा मंत्र सांगितला आहे.