'लाडकी बहीण'चा घरुनच 'अ‍ॅप'द्वारे भरा फॉर्म

Amit Ujagare (अमित उजागरे)

महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे.

Ladaki Bahin Yojana

यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. या योजनेला पात्र असणाऱ्या महिलांना महिन्याला १,५०० रुपये मिळणार आहेत.

Ladaki Bahin Yojana

या योजनेंतर्गत पात्र महिलांची वयोमर्यादा ६५ वर्षे असून एका कुटुंबातील दोन महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.

Ladaki Bahin Yojana

या योजनेच्या लाभासाठी कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक असता कामा नये.

Ladaki Bahin Yojana

तसंच यासाठी उत्पन्नाचा दाखला नसेल तर पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड, मतदान कार्ड याची गरज भासणार आहे.

Ladaki Bahin Yojana

आत्तापर्यंत शासनमान्य सेतू कर्यालयात विहित नमुन्यातील अर्जासह कागदपत्रे जोडून देण्यासाठी गर्दी होत आहे. पण आता नारीशक्ती अॅपच्या माध्यमातून देखील या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.

Ladaki Bahin Yojana

गुगल प्ले स्टोअरवरुन हे अॅप डाऊनलोड करायचं आहे. त्यांतर त्यात मोबाईल क्रमांक टाकून लॉगिन करायचं. त्यानंतर त्यातील आपल्या प्रोफाईलमध्ये जाऊन संपूर्ण माहिती भरायची. त्यानंतर तुम्ही कोणत्या गटात मोडता तो गट निवडायचा आहे.

Ladaki Bahin Yojana

हे सर्व सबमिट केल्यानंतर इच्छुक आणि पात्र महिलेच्या अर्जाची छाननी होऊन त्यात ती पात्र ठरल्यास तीला दरमहा १५०० रुपये इतकी रक्कम थेट बँक खात्यात जमा होणार आहे.

Ladaki Bahin Yojana

टाइम प्लीज! समीर अन् जुईलीचं शुभमंगल सावधान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sameer Vidwans
येथे क्लिक करा...