Anuradha Vipat
अभिनेते ऋषी कपूर यांना जाऊन आता का चार वर्षे होतील.
ऋषी कपूर यांची लेक रिद्धिमा कपूर सहानी त्यांची आठवण काढत अनेकदा भावुक होते
करोनामुळं सर्व देशात लॉकडाऊन असल्यानं रिद्धिमाला आपल्या वडिलांचं अंत्यदर्शनही घेता आलं नव्हतं
या गोष्टीची सल आजही तिच्या मनात असल्याचं ती नेहमीचं सांगते आहे
निधनाच्या दोन दिवस आधीच ऋषी यांनी तिला कॉल केला होता पण तिनं तो उचलला नव्हता...अशी एक आठवणही तिनं आता सांगितली आहे.
काश ...तो कॉल उचलला असता, तर मी त्यांच्याशी शेवटचं बोलू शकले असते,असं रिद्धिमा म्हणाली आहे