Amit Ujagare (अमित उजागरे)
१) लखपती दीदी ही केंद्र सरकारची योजना आहे. महिलांचा उद्योगांमध्ये सहभाग वाढावा हा याचा हेतू आहे.
२) ही कौशल्य प्रशिक्षण योजना असून याद्वारे महिलांना एक ते पाच लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन दिलं जातं.
३) महिला बचत गटांशी जोडलेल्या महिलांसाठी ही योजना खास ठरणारी आहे. या योजनेसाठी १८ ते ५० वयोगटातील महिला अर्ज करु शकतात.
४) एकूण ३ कोटी महिलांना या योजनेमार्फत जोडण्याचा केंद्र सरकारचं ध्येय आहे.
५) घरात कोणी सरकारी नोकरीत असेल तर या योजनेचा फायदा मिळणार नाही. तसंच लाभार्थी महिलेचं ३ लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणं गरजेचं आहे.
६) या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांकडं आधार, पॅन, इन्कम प्रूफ, बँक पासबूक, पासपोर्ट साईज फोटो, मोबाईल नंबर आवश्यक आहे.
७) या योजनेच्या लाभासाठी महिलांना बचत गटाच्या माध्यमातून एका उद्योगाचं नियोजन करावं लागेल. या उद्योगाचा आराखडा सरकारला पाठवला जाणार.
८) या आराखड्याची सरकार पडताळणी करणार त्यानंतर सर्व अटींची पूर्तता होत असेल तर महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जाईल.