Swadesh Ghanekar
मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित गणपतीची मूर्ती म्हणजे लालबागचा राजा
लाखो मुंबईकर लालबाग येथे गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी एकत्र येतात.
१९००च्या दशकात लालबाग परिसरात अंदाजे १३० १३० कापूस गिरण्या होत्या. त्यामुळे या परिसराला गिरणगाव किंवा गिरण्यांचे गाव असेही म्हणत.
१९३२ मध्ये औद्योगिकीकरणाचा फटका येथील व्यापारी, विक्रेते आणि मच्छीमार समाजावर झाला.
सुदैवाने, समाजाला नंतर नवीन बाजारपेठ सुरू करण्यासाठी भूखंड मिळाला आणि त्यांनी त्याचा एक भाग सध्याचा लालबाग वार्षिक सार्वजनिक गणेश मंडळाला समर्पित करण्याचा निर्णय घेतला.
१९३४ मध्ये लालबागच्या राजाची स्थापना झाली आणि यंदा त्याचे ९०वे वर्ष आहे..
१९३५ मध्ये कांबळी कुटुंबाचे प्रमुख रत्नाकर कांबळी यांनी गणपती मूर्ती तयार करण्याची जबाबदारी घेतली.
तेव्हापासून मूर्ती घडवण्याची आणि त्याची देखभाल करण्याची त्यांच्या कुटुंबाची परंपरा आहे.
लालबागच्या राजाची मूर्ती साधारणपणे १८-२० फूट उंच असते.
लालबागच्या राजाच्या चरणी मोठमोठे सेलेब्रिटी, राजकारणी, उद्योगपती नतमस्तक होतात...
मुंबई, भारताच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे, तर जगभरातून भाविक राजाच्या दर्शनासाठी येतात..