Aishwarya Musale
आपल्याला आपल्या छत्रपती संभाजीनगर शहराचा पक्षी निवडायचा आहे. त्यासाठी ‘सकाळ’, एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाउंडेशन आणि एज्युकेशनल अकादमी व निसर्ग मित्र मंडळाच्यावतीने स्पर्धा घेण्यात येत आहे.
तपकिरी करड्या रंगाचा, चोच मोठ्या आकाराची आणि चोचीवर एक वैशिष्ट्यपूर्ण उंचवटा, निमुळती होत गेलेली लांब शेपटी; अशी याची ओळख आहे.
निसर्गातील फळे खाऊन Indian Grey Hornbill हा पक्षी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाचे काम करतो.
काळ्या पिवळ्या रंगाचा, पंखावर दोन सफेदरंगी दंडरेषा असलेला चिमणीपेक्षा किंचित मोठा पक्षी. अशी याची ओळख आहे
Common Iora हा पानांमध्ये बसलेले कीटक शोधतो आणि खातो, अत्यंत मंजूळ आवाजात शिट्ट्या वाजवतो.
शहरात प्रत्येकाच्या घरात दिसणारा निळसर काळ्या रंगाचा पक्षी, पंखावर सफेद रंगाचा धब्बा, शेपटीच्या मुळाखाली लाल रंगाची पिसे असतात.
आपली शेपटी हळुवार खाली-वर करत किडे पकडत असतो.
चमकदार काळ्या रंगाचा पक्षी, गडद तपकिरी रंगाचे पंख, लालबुंद डोळा आणि काळ्या रंगाची लांबरुंद शेपटी. अशी याची ओळख आहे.
Greater Coucal हा घराच्या कंपाउंडवरून चालत जाणारा मोठे कीटक, सुरवंट, गोगलगायी खातो. वैशिष्ट्यपूर्ण घुमणारा आवाज.
चमकदार सोनेरी पिवळा रंग, पंख आणि शेपटीवरही काळ्या रंगछटा, हिरवट रंगाची झाक. अशी याची ओळख आहे.
झाडाझुडुपातून वावरणारा Golden Oriole हा पक्षी वड, पिंपळ, बोरं खातो. फुलांमधील मकरंदही पितो.
हा उपक्रम पक्षीतज्ज्ञ डॉ. दिलीप यार्दी, महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेचे किशोर गठडी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. अधिक माहितीसाठी एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाउंडेशन आणि एज्युकेशनल अकादमीचे कुणाल विभांडिक यांच्याशी ७२७६८९५९१९ संपर्क साधावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.