Anuradha Vipat
अनुराधा पौडवाल यांनी आपल्या सुमधून आवाजाने लाखो श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आहे.
कधीकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अनुराधा पौडवाल सध्या मनोरंजन विश्वापासून खूप दूर गेल्या आहेत.
अनुराधा पौडवाल यांनी 'अभिमान' चित्रपटातून आपल्या गायनाची सुरुवात केली.
एक काळ असा होता जेव्हा अनुराधा पौडवाल यांना दुसऱ्या लता मंगेशकर असंही म्हटलं जात होतं.
अनुराधा पौडवाल यांनी पंजाबी, बंगाली, मराठी, तमिळ, तेलगू, उडिया आणि नेपाळी भाषांमध्येही भरपूर गाणी गायली आहेत.
गायिका अनुराधा यांचे लग्न संगीतकार अरुण पौडवाल यांच्याशी झाले होते.
१९९१मध्ये त्यांच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला आणि दोन्ही मुलांच्या संगोपनाची जबाबदारी अनुराधा यांच्यावर पडली.