Pilati Butterfly : छान किती दिसते फुलपाखरू! छोट्याशा अळीपासून कसे तयार होते फुलपाखरू?

सकाळ डिजिटल टीम

कोणत्याही फुलपाखरांचे जीवनचक्र अभ्यासणे म्हणजे एक तपश्चर्या असते. कितीतरी तास तो एक क्षण टिपण्यासाठी तिथे ध्यानस्थ बसावे लागते.

Pilati Butterfly

कॉमन ग्रास यलो (Eurema hecabe) म्हणजे तृण पिलाती फुलपाखराचे कोषातून बाहेर येणे टिपण्यासाठी सलग ४ तास मला त्यावर नजर रोखून राहावे लागले होते.

Pilati Butterfly

कारण एकदा का कोष मॅच्युअर झाला की फुलपाखरू कोषातून अगदी कोणत्याही क्षणी बाहेर येऊ शकते.

Pilati Butterfly

जवळपास १७ ते १८ दिवसांचा जीवनक्रम छायाबद्ध करण्यात मला लाभलेला आनंद अवर्णनीय आहे, असे प्रतिपादन छायाचित्रकार मंगल राणे यांनी केले.

Pilati Butterfly

फुलपाखरांची निरीक्षणे नोंदवणे हे फार कष्टाचे, संयमाचे काम आहे. निरक्षण फार महत्त्वाचे असते. अंडे ते प्रौढ फुलपाखरू या संपूर्ण जीवनक्रमात फुलपाखराला अनेक स्थित्यंतरांतून जावे लागते.

Pilati Butterfly

राणे म्हणाल्या की, एका कुंडीत विलायती चिंचेचे रोप आले होते. ते या पिवळ्या फुलपाखराचे खाद्य वनस्पती आहे हे मला माहिती होते. त्याप्रमाणे मग मी निरीक्षण केले.

Pilati Butterfly

या फुलपाखराचे हे संपूर्ण जीवनचक्र मी पाहू शकले. एकाच दिवशी एकूण सहा फुलपाखरे अगदी सुखरूप कोषातून बाहेर आली. माझ्यासाठी तो एक सोहळा होता.

Pilati Butterfly

आंबट-गोड चव असणाऱ्या 'या' फळाचे कोणते आहेत आरोग्यदायी फायदे? जाणून घ्या कोणतं आहे ते औषधी फळ

येथे क्लिक करा