सकाळ डिजिटल टीम
सध्या बिग बॉसची सर्वात लोकप्रिय स्पर्धक कोणी असेल, तर ती शिवानी कुमारी आहे. गावातील मुलीनं बिग बॉसच्या घरात खळबळ उडवून दिली आहे.
शिवानी मूळची उत्तर प्रदेशची आहे. अरायारी गावात राहणारी शिवानी तिच्या साधेपणासाठी प्रसिद्ध आहे.
शिवानीनं तिच्या रील व्हिडिओ कंटेंटच्या जोरावर स्वत:ची एक खास ओळख निर्माण केलीये. आज ती खूपच लोकप्रिय आहे.
पण, तुम्हाला हे माहीत आहे का? एकेकाळी शिवानीकडं चप्पल घेण्यासाठीही पैसे नव्हते.
शिवानी फक्त 23 वर्षांची आहे. पूर्वी ती इंटरनेटवर डान्स व्हिडिओ शेअर करायची. पण, तिच्या व्हिडिओंना व्ह्यूज मिळत नव्हते.
मग, एक दिवस ती तिच्या मैत्रिणींसोबत बाजारात चप्पल खरेदीसाठी गेली आणि तिथं तिनं आपल्या ग्रामीण भाषेत स्वतःचा व्हिडिओ बनवला आणि इंटरनेटवर पोस्ट केला.
शिवानीच्या त्याच व्हिडिओला २४ तासांत १० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. यानंतर, जेव्हा टिकटॉकवर बंदी घातली गेली, तेव्हा तिला यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर जावे लागले.
शिवानीचं आयुष्य खूप कठीण गेलं. एकेकाळी घरात जेवणासाठीही पैसे नव्हते. पण, त्यानंतर तिनं खूप मेहनत करून आपलं नाव केलं आणि आज शिवानी चांगली कमाई करत आहे.
शिवानीला सोशल मीडियावर लोकांचा खूप पाठिंबा मिळत आहे. तिच्या चाहत्यांना तिला बिग बॉसची ट्रॉफी जिंकताना पाहायची आहे. पण, शिवानी चाहत्यांचं हे स्वप्न पूर्ण करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.