Washing Bras Tips : ब्रेसियर धुताना या गोष्टी कायम लक्ष्यात ठेवा, अस्वच्छ ब्रेसियरमुळे होतील गंभीर आजार

सकाळ डिजिटल टीम

ब्रेसियर ही एक अशी गोष्ट आहे जी महिलांच्या स्तनांना योग्य आकार देण्यास मदत करते.

washing bras tips | esakal

महिलांना फॅशन, सौंदर्य आणि शारीरिक काळजी यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात.

washing bras tips | esakal

महिलांची अंडरगारमेंट्स योग्य शारीरिक मापानुसार असणे जितके गरजेचे आहे तितकेच त्यांची स्वच्छता असणे पण महत्वाचे आहे.

washing bras tips | esakal

या गोष्टींची काळजी

या गोष्टींची काळजी घेतल्यास आपण आपली महागडी ब्रेसियर खराब होण्यापासून वाचवू शकता.

washing bras tips | esakal

ब्रेसियर धुताना पिळू नका

महिला पॅडेडपासून ते स्पोर्ट्सब्रापर्यंत सगळ्याच प्रकारच्या ब्रेसियर वापरतात. या सगळ्या प्रकारांतील ब्रेसियर धुताना पिळू नये. असे केल्याने त्याच्या आतील पॅडेड स्पंज खराब होऊ शकतो व ब्रेसियरचा आकार बदलू शकतो.

washing bras tips | esakal

इतर कपड्यांसोबत धुणे टाळावे

जर मशीनमध्ये जास्त फॅब्रिकचे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे असतील तर ते आपल्या ब्रेसियरचा आकार खराब करू शकते. त्यामुळे रोजच्या कपड्यांसोबत आपली ब्रेसियर धुणे टाळावे.

washing bras tips | esakal

ब्रेसियर हाताने धुवा

ब्रेसियर हाताने धुणेच योग्य आहे कारण मशीनमध्ये धुतल्याने त्याचे पट्टे व हुक खराब खराब होऊ शकतात.

washing bras tips | esakal

ब्रेसियर गरम पाण्याने धुवू नका

गरम पाणी वापरल्याने ब्रेसियर मधील लवचिकता खराब होते आणि काही काळानंतर ब्रेसियरचे फॅब्रिक देखील मऊपणा गमावू लागते.

washing bras tips | esakal

वॉशिंग बॅगचा वापर करावा

ब्रेसियर थेट वॉशिंग मशिनमध्ये धुण्याऐवजी वॉशिंग बॅगमध्ये टाकून मगच मशीनमध्ये धुण्यासाठी टाकावी. कापड किंवा हुक खराब होणार नाहीत.

washing bras tips | esakal

मोकळ्या जागेत वाळत घालावेत

हलक्या उन्हात आतले कपडे वाळत घातल्यास हवा आणि ऊन यांमुळे ते चांगले वाळतात आणि स्वच्छ कोरडे होतात.

washing bras tips | esakal

या महत्त्वाच्या गोष्टींची नक्कीच काळजी घ्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

washing bras tips | esakal