सकाळ डिजिटल टीम
इतर कोणताही मेकअप न करता फक्त लिपस्टिक लावली तरी चेहऱ्याला एक वेगळा लुक आलेला दिसतो.
पण बरेचदा पुर्ण मेकअप करूनही आपण लिपस्टिकच्या शेडने खूश नसतो. कारण प्रत्येक स्कीनटोनला त्याला योग्य अशी लिपस्टिक लावणं आवश्यक आहे.
जर तुमचा स्कीनटोन फारच गोरा, पांढरा असेल आणि स्कीन टॅन असेल तर मॉव कलरची लिपस्टिक लावा किंवा जर टॅनिंग नसेल तर पिंकची शेट चांगला दिसेल.
जर तुमचा स्कीनटोन पिंगट गोरा असेल तर पिंक किंवा ब्राऊन, ऑरेंज ब्राऊन आणि रेड ब्राऊन च्या शेड्स चांगल्या दिसतात.
न्युट्रल अंडरटोन स्कीन ऑलिव्ह कलरसारखी असते. यावर ब्राइट कलर चांगले दिसतात. जसे लाल किंवा हॉट पिंक लिपस्टिक्स चांगल्या दिसतात.
मध्यम स्कीनटोनच्या महिलांना पर्पल रेड, वाइन, रोज पिंक कलर चांगले दिसतात.
जर तुमचा स्कीनटोन डार्क असेल आणि अंडरटोन कूल असेल तर प्लम, कूल रेड, बेरी कलर चांगले दिसतात तर वार्म अंडरटोनला डार्क ब्राउन, कूल रेड, गुलाबी, लाइट ब्राइट कलर चांगले दिसतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.