Pranali Kodre
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत अनेक विक्रम मोडीत निघाले आहेत. यामध्ये पुरुषांच्या थाळीफेकीच्या विक्रमाचाही समावेश आहे.
लिथुआनियाचा २१ वर्षीय थाळी फेकपटू मायकोलस अलेकनाने त्याच्या वडिलांनी व्हर्जिल यांनी २० वर्षांपूर्वी २००४ ऑलिम्पिकमध्ये केलेला विक्रम मोडला.
मायकोलसने अंतिम फेरीत दुसऱ्या प्रयत्नात ६९.९७ मीटर लांब थाळी फेकली. यासह तो ऑलिम्पिकमध्ये सर्वात लांब थाळी फेकणारा खेळाडू ठरला.
यापूर्वी हा विक्रम त्याच्या वडिलांच्या नावावर होता. त्यांनी २००४ मध्ये ६९.८९ मीटर लांब थाळी फेकलेली. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत २ सुवर्ण आणि १ कांस्य पदक जिंकले आहे.
मात्र, असं असलं तरी मायकोलस याला सुवर्णपदक मिळू शकलं नाही कारण त्याचा स्पर्धक जमैकाच्या रोज स्टोना याने त्याचा विक्रम काही क्षणात मोडत नवा विक्रम प्रस्थापित केला.
स्टोनाने चौथ्या प्रयत्नात ७० मीटर लांब थाळी फेकली आणि ऑलिम्पिक विक्रमासह सुवर्ण पदक जिंकले.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की व्हर्जिन यांचा मोठा मुलगा आणि मायकोलसचा मोठा भाऊ मार्टिन देखील पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेला. पण तो अंतिम फेरीपर्यंत पोहचू शकला नव्हता.