पुजा बोनकिले
आज लोकसभा २०२४ च्या निवडणूकांचा निकाल जाहीर झाला आहे.
गुजरातमधील गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून गृहमंत्री अमित शाहांचा दणदणीत विजय झाला आहे.
अमित शाहांच्या विरोधात काँग्रेसच्या उमेदवार सोनल रमणभाई पटेल होते.
अमित शाह यांचा दुसऱ्यांदा येथून विजयी ठरले आहेत.
2019 मध्ये अमित शाहांना 8 लाखांहून अधिक मते मिळाली होती
2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमित शाह यांना गांधीनगर मतदारसंघातून 8.94 लाख मते मिळाली होती.
दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे चतुरसिंह जानवजी चावडा होते, त्यांना ३.३७ लाख मते मिळाली.