निवडणुकीतील गैरप्रकार रोखणार ‘सी-व्हिजिल ॲप’, असं करतं काम...

Manoj Bhalerao

लोकसभा निवडणुकीत आचारसंहिता भंगाच्या तक्रारी तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘सी-व्हिजिल’ हे मोबाईल ॲप विकसित केले आहे.

C-Vigil App

या ॲपद्वारे नागरिकांना निवडणुकीतील गैरप्रकारांची माहिती थेट प्रशासनाला देणे सुलभ होणार आहे.

C-Vigil App

लोकसभा निवडणूक अधिकाधिक पारदर्शकपणे व्हावी. तसेच निवडणुकीत कोणते अनधिकृत प्रकार होऊ नये. निवडणुकीत शंभर टक्के आचारसंहितेचे पालन व्हावे, यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

C-Vigil App

त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून निवडणुकीतील गैरप्रकाराची माहिती आयोगाला समजावी, या हेतूने आयोगाने हे ॲप विकसित केले आहे.

C-Vigil App

हे लक्षात ठेवा

ॲपच्या माध्यमातून फोटो अथवा दोन मिनिटांपर्यंतचा व्हिडिओ काढून तो अपलोड करावा लागणार

यासाठी मोबाईलमध्ये इंटरनेट सेवा आणि जीपीएस लोकेशन ही सुविधा असणे आवश्‍यक

C-Vigil App

अॅपवरून आचारसंहिता भंगाची माहिती दिल्यास ती जिल्हा प्रशासनाकडे येईल

जिल्हा प्रशासनाकडून ही तक्रार संबंधित लोकसभा मतदारसंघाकडे पाठविली जाईल

C-Vigil App

त्यानंतर त्या मतदारसंघातील भरारी पथक घटनास्थळी जाऊन त्यावर कारवाई करणार.

अक्षांक्ष व रेखांशद्वारे प्रशासनाला लोकेशन समजणार.

त्यामुळे अधिकची माहिती तक्रारदाराला द्यावी लागणार नाही.

C-Vigil App

असाही फायदा

‘व्हीएचए’ या अॅपद्वारे मतदार आपले नाव मतदार यादीत शोधू शकतात. तसेच मतदान केंद्राची माहिती मिळेल. तसेच मतदान ओळखपत्र या अॅपद्वारे डाऊनलोड करून घेता येणार आहे.

C-Vigil App

‘केवायसी-ईसीआय’ या अॅपमध्ये निवडणुकीतील उमेदवाराचे प्रतिज्ञापत्र, गुन्हे दाखल असेल तर त्याची माहिती नागरिकांना मिळेल.

C-Vigil App

राणीबागेतील बहुतांश प्राण्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

rani bag | sakal
येथे क्लिक करा