सकाळ डिजिटल टीम
दिल्लीतील वाटाघाटीनंतर बुधवारी खासदार उदयनराजे भोसले यांचे काल रात्री पहिल्यांदाच साताऱ्यात आगमन झाले.
या वेळी जमलेल्या हजारो समर्थकांनी उदयनराजेंचं ठिकठिकाणी जल्लोषी स्वागत केलं.
घोषणाबाजी, वाद्यांचा कडकडाट, फटाक्यांची आतषबाजी, फुलांची उधळणीमुळे संपूर्ण सातारा उदयनराजेमय झाला होता.
बुधवारच्या शक्तिप्रदर्शनामुळे आगामी काळातील प्रचारातील ताकद उदयनराजे समर्थकांनी सर्वांना दाखवून देत ‘आरंभ है प्रचंड’चा नारा पुन्हा एकदा बुलंद केला.
या वेळी क्रेनच्या मदतीनं उंचावर टांगलेल्या पाळण्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
शाही मशिद इथं थांबून उदयनराजे यांनी मुस्लिम बांधवांशी संवाद साधत त्यांच्या स्वागताचा स्वीकार केला.
दरम्यान, जमलेल्यांच्या स्वागताचा स्वीकार करत उदयनराजे भोसले हे जलमंदिर येथे दाखल झाले. याठिकाणीही स्वागतासाठी मोठी गर्दी जमली होती. (फोटो - प्रमोद इंगळे)