आजी-माजी मुख्यमंत्र्यांसह दिग्गज नेत्यांनी केले मतदान

आशुतोष मसगौंडे

उद्धव ठाकरे

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे तसेच तेजस ठाकरे यांनी वांद्रे येथील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.

Uddhav Thackeray | Esakal

एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबियांसह ठाण्यातील वागळे इस्टेट येथील नेपच्यून आय टी पार्कमधील मतदान केंद्रात आज मतदानाचा हक्क बजावला.

Eknath Shinde | Esakal

वर्षा गायकवाड

मुंबईतील धारावीमध्ये मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड यांनी आपल्या आईसोबत मतदान केले.

Varsha Gaikwad | Esakal

उज्वल निकम

मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार उज्वल निकम यांनी आपल्या कुटुंबियांसाठी मुबईतील मतदान केंद्रावर मतदान केले.

Ujwal Nikam | Esakal

प्रियंका चतुर्वेदी

शिवसेनेच्या (UBT) राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी आज मुंबईत मतदान केले. याचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

Priyanka Chaturvedi | Esakal

भाई जगताप

काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार भाई जगताप यांनी आपल्या कुटुंबियांसह लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला.

Bhai Jagtap

राज्यपाल रमेश बैस

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आपल्या पत्नीसह राजभवन क्लब मतदान केंद्रावर मतदान केले.

Ramesh Bais | Esakal

विनोद तावडे

भाजप नेते विनोद तावडे यांनी विले पार्ले येथिल साठ्ये महाविद्यालयातील मतदान केंद्रावर पत्नी आणि कन्येसह मतदान केले.

Vinod Tawade | Esakal