Monika Lonkar –Kumbhar
यंदा १५ ऑगस्टनंतर जोडून ४ दिवस सुट्ट्या आल्या आहेत.
या लॉंग विकेंडमुळे अनेक जण बाहेर फिरायला जाण्याचे प्लॅन्स बनवतात.
या लॉंग विकेंडला कुटुंबासोबत किंवा मित्र-मैत्रिणींसोबत फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत.
चार दिवसांच्या सुट्टीमध्ये तुम्ही कर्नाटकातील कुर्ग या हिलस्टेशनला नक्की जाऊ शकता
उत्तराखंड राज्यातील नैनितालमध्ये तुम्हाला अनेक प्रेक्षणीय स्थळे पाहता येतील.
केरळमधील सुप्रसिद्ध ठिकाण म्हणून वागामो प्रसिद्ध आहे. या परिसरातील उंच पर्वत, घनदाट जंगले, तलाव आणि धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात.
उत्तराखंड राज्यातील औली हिलस्टेशनला 'मिनी स्वित्झर्लंड म्हटले जाते. हे हिल स्टेशन बर्फाच्छदीत आहे.