Saisimran Ghashi
मॅडी म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता आर माधवनने चमत्कार वाटावा इतक्या वेगाने आपलं वजन कमी करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
अलीकडेच त्याने मुलाखतीत इंटरमिटंट फास्टिंग केल्याने वजन कमी करण्यास कशी मदत झाली याविषयी सांगितले आहे.
खूप व्यायाम, धावणे, शस्त्रक्रिया, औषधोपचार असं काहीही न करता 21 दिवसांत मी कसं वजन कमी केलं ते आर.माधवननी सांगितलं.
नेमका कोणता फंडा वापरून माधवनने वजन कमी केलं हे आणि तुम्हीही तस वजन कमी करू शकता काय जाणून घेऊया.
साधारण ४५ ते ६० वेळा अन्न चघळण्याची सवय लावा. तुमचं अन्न घ्या व पाणी सुद्धा चावून चावून खा.
दिवसातील शेवटचं जेवण साधारण ६ वाजून ४५ मिनिटांपर्यंत करून घ्यावं.
फक्त शिजवलेलं अन्नच खावं, दुपारी ३ वाजल्यानंतर कच्चे पदार्थ खाऊ नयेत.
सकाळी लवकर चालायला जावं. भरपूर द्रवाचे सेवन करा.
रात्री झोपण्यापूर्वी ९० मिनिटे तरी कोणत्याही प्रकारच्या स्क्रीनसमोर वेळ घालवू नये.
भरपूर हिरव्या भाज्या खा आणि असं अन्न निवडा जे तुमच्या शरीराला लगेच पचवता येईल. प्रक्रिया केलेलं अन्न शक्यतो टाळाच.
जीम आणि रनिंग न करता आर माधवनने सांगितलेले ‘हे’ ७ नियम पाळून २१ दिवसांत वजन कमी करू शकता.