त्वचेसाठी फायदेशीर आहे कमळ, जाणून घ्या 'हे' होममेड फेसपॅक्स

Monika Lonkar –Kumbhar

त्वचेसाठी फायदेशीर

कमळाच्या फुलाचा वापर हा त्वचेसाठी फायदेशीर ठरतो. या फुलामुळे त्वचेच्या समस्या दूर केल्या जाऊ शकतात.

Lotus For Skin

कमळ

चेहऱ्यावरील मृत त्वचा, पिंपल्स आणि काळे डाग इत्यादी समस्या दूर करण्यासाठी कमळाचे फूल फायदेशीर आहे. कमळाच्या फुलासोबत इतर घटकांचा वापर करून फेसपॅक्स बनवले जाऊ शकतात.

Lotus For Skin

मसूर डाळ आणि कमळ

मसूरडाळीमुळे आपल्या त्वचेवर एक प्रकारचा उजळपणा येतो. कमळाचे फूल आणि मसूर डाळीचा फेसपॅक तयार करण्यासाठी कमळाच्या फूलांचा चुरा करून घ्या किंवा कमळाचे फूल स्मॅश करून याची एक पेस्ट तयार करा.

Lotus For Skin

चेहऱ्यावर येईल उजळपणा

आता या पेस्टमध्ये १-२ चमचे दूध मिसळा. आता यामध्ये २ चमचे बारीक केलेली मसूर डाळ मिक्स करा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यानंतर २०-२५ मिनिटांनंतर चेहरा धुवून टाका.

Lotus For Skin

हळद आणि कमळ

कमळाचे फूल आणि हळदीचा फेसपॅक आपल्या चेहऱ्यावर ग्लो आणण्यास मदत करते. हा फेसपॅक तयार करण्यासाठी कमळाचे फूल स्मॅश करा. आता यामध्ये चिमूटभर हळद मिक्स करून याची पेस्ट चेहऱ्यावर लावा. १५-२० मिनिटांनी चेहरा धुवा.

Lotus For Skin

दही आणि कमळ

कमळाच्या फुलाच्या पाकळ्या बारीक करून त्यात एक चमचा दही मिसळा. आता हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा. २०-२५ मिनिटांनी चेहरा धुवून टाका.

Lotus For Skin

चेहऱ्यावर येईल चमक

दही आणि कमळाच्या फुलाचा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील मृत पेशी निघून जाण्यास मदत होते. शिवाय, चेहऱ्यावर छान चमक येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lotus For Skin