Pranali Kodre
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टँकोव्हिच यांनी ४ वर्षांच्या सुखी संसारानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
जुलै २०२४ मध्ये त्यांनी चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर वेगळे झाल्याचे जाहीर केले होते.
त्यांनी वेगळे झाल्याचं सांगताना त्यांच्या मुलाचे अगस्त्यचे सहपालकत्व स्वीकारल्याचं सांगितलं होतं. दरम्यान, सध्या नताशा अगस्त्यसह सार्बियाला गेलेली आहे.
याचदरम्यान, २७ ऑगस्टला नताशाने एक गुढ अर्थ लपलेली पोस्ट शेअर केली होती, ज्याची सध्या बरीच चर्चा आहे.
तिच्या पोस्टमध्ये 'प्रेम संयम आहे, प्रेम दया आहे. त्याच हेवा, बढाई मारणे नसते. त्यात अभिमान नसतो. प्रेम इतरांचा अपमान करत नाही. प्रेम स्वार्थ साधणारं नसतं. ते सहजासहजी चिडणारे नसते,'अशा अर्थाची वाक्य लिहिलेली होती.
पुढे लिहिले होते की 'प्रेमात चुकीचा विचार केला जात नाही, वाईटात आनंद मानत नाही, पण सत्यात नेहमीच आनंदी होते. ते नेहमी संरक्षण करते, विश्वास ठेवते, आशा ठेवते, जतन करते. प्रेम कधीच हरत नाही.'
घटस्फोटानंतर नताशाने अशी पोस्ट का केली असावी असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे.