सकाळ डिजिटल टीम
कमी पैशामध्ये एखादी लग्जरी आणि आरामदायक ट्रिप करावी असा विचार तुम्ही करत असाल तर या काही टिप्स उपयोगी येतील.
हिलस्टेशन फिरण्यासाठी जायचं असेल तर मार्च महिन्यात जा. कारण ऑफ सिझनमध्ये तिकीटाची किंमत कमी असते त्यामुळे राहण्या-खाण्याचे रेटही कमी असतात.
जर तुम्ही अशा काही ठिकाणी जाणार असाल तर तुम्ही सरकारी बसने प्रवास करा कारण हे दर तुलनेत स्वस्त असतात.
सुरुवातीलाच हॉटेल बुकिंग करुन ठेवा यामुळे बजेटनुसार तुम्हाला रुम मिळेल.
बाहेर पडण्याआधी घरी तयार केलेले काही पदार्थ पॅक करुन घ्या. यामुळे बाहेर होणारा खर्च वाचवू शकाल.
एखाद्या ठिकाणाबद्दल माहिती नसेल तर तिथे शॉपिंग करणे टाळा. यामुळे तुमचे पैसे वाचतील आणि इतर ठिकाणी तुम्ही ते वापरु शकता.
शक्यतो एखाद्या स्थानिकाशी मैत्रि किंवा ओळख होते का पहा. यामुळे कमी पैशात तुम्हाला अधिक सुविधा असणारे काही लोकेशन्स मिळतील.
या सर्व प्लॅनिंगसाठी तुम्ही स्मार्ट वर्क करु शकता. कमी पैशात चांगली ट्रिप झाली की तुम्हालाही त्याचा आनंद होतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.