अष्टविनायकाची यात्रा कधीही न केलेल्या खेबूडकरांनी असं लिहिलं 16 मिनिटांचं ते गाजलेलं गाणं

kimaya narayan

अष्टविनायक

अभिनेते सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री वंदना पंडित यांची मुख्य भूमिका असलेला 'अष्टविनायक' हा सिनेमा खूप गाजला.

सुपरहिट गाणं

या सिनेमातील सगळीच गाणी सुपरहिट ठरली पण या सिनेमाच्या शेवटी असलेलं 'अष्टविनायका तुझा महिमा कसा' हे गाणं सुपरहिट ठरलं.

सगळ्यात मोठं गाणं

हे गाणं 16 मिनिटांचं असून या संपूर्ण गाण्यात अष्टविनायकांमधील आठही गणपतींची महती गाण्यातून वर्णन करण्यात आली आहे.

सर्व दिग्गज कलाकारांची वर्णी

या गाण्यामध्ये त्या काळातील अनेक आघाडीच्या मराठी कलाकारांनी परफॉर्म केलं होतं. अशोक सराफ, रवींद्र महाजनी, आशा काळे, रंजना अशी मुख्य नावं घेता येतील.

गीतकार जगदीश खेबुडकर

पण या गाण्यातील इंटरेस्टिंग ट्विस्ट तुम्हाला माहितीये का ? हे गाणं सुप्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर यांनी लिहिलं होतं.

अष्टविनायकांविषयी अज्ञान

पण खरं म्हणजे जगदीश खेबुडकर यांनी कधीच अष्टविनायकाची यात्रा केली नव्हती. त्यामुळे त्यांना या गणपतींविषयी काहीच माहित नसल्याचं त्यांनी सचिन यांचे वडील आणि सिनेमाचे निर्माते शरद पिळगावकर यांना सांगितलं.

फक्त पुस्तक वाचून लिहिलं गाणं

जगदीश यांची अडचण ऐकताच शरद यांनी त्यांना अष्टविनायक गणपतीवरील एक पुस्तक वाचायला दिलं आणि ते पुस्तक वाचताच काही वेळातच जगदीश यांनी हे अजरामर गाणं लिहिलं.

अतुल परचुरे यांचा अखेरचा सिनेमा - येथे क्लिक करा