Sandip Kapde
वर्धा येथील बजाज कुटुंबाने पुण्यात स्कूटर तयार केली आणि ती भारतात नाहीत तर जगात गाजली. आम्ही सांगतोय एम-८० बद्दल...
विदर्भातील वर्ध्याचे असलेल्या बजाज कुटुंबाजी कर्मभूमी ही पुणे होती. त्यांनी बनवलेल्या एम-८० च्या बुकींसाठी ५ वर्ष थांबाव लागत होत.
स्कूटर ही नोकरदार मिडल क्लास लोकांची ओळख होती.
एम-८० जेव्हा लॉन्च झाली तेव्हा पहिल्याच दिवशी तब्बल १२ लाख गाड्या बुक झाल्या होत्या
इटलीच्या प्याजीओ बरोबर करार करून भारतात चेतक स्कुटरची निर्मिती ही राहुल बजाज यांची आयडिया होती.
हॉवर्ड विद्यापीठात शिकून आलेल्या राहुल यांनी बजाजला आधुनिक बनवलं
स्कुटरच्या पलीकडे बजाज ऑटोला वाढवल तर ग्रामीण भारताचं मोठं मार्केट आपल्यासाठी खुलं होईल हे राहुल बजाज यांनी ओळखलं होतं.
राहुल बजाज म्हणजे जमनालाल बजाज यांचे नातू.ग्रामीण भागातील रस्त्यांवर टिकेल अशी हलक्या वजनाची आणि चांगल्या ऍव्हरेजची गाडी बनवायची असा चंग राहुल बजाज यांनी बांधला होता.
बजाजने आतापर्यंत अनेक गाड्या बनवल्या पण परदेशी गाड्यांवर आधारित होत्या पण एम-५० पूर्णपणे बजाजच्या आकुर्डी प्लांटवर बनवण्यात आली होती.
१९८१ मध्ये गाडी बनली, सर्वांना ही गाडी दिसायला आणि चालवायला देखील आवडली. हलकी, सुटसुटीत, एव्हरेज जबरदस्त अशी या गाडीची ओळख निर्माण झाली. मात्र राहुल बजाज मात्र पूर्णपणे समाधानी नव्हते.
त्यांनी या गाडीला परिपूर्ण बनवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्यांच्या टिमला कामाला लावलं. त्यांनी गाडीतील समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर १९८६ साली या गाडीचे पुढचे व्हर्जन आले एम-८०
एम-८० जेव्हा लॉन्च झाली तेव्हा पहिल्याच दिवशी तब्बल १२ लाख गाड्या बुक झाल्या होत्या. उदयपूर सारख्या शहरात दंगल होऊ नये म्हणून पोलीस दल तैनात करावं लागलं होत, असे राहुल बजाज यांनी सांगितले होते.
एम-८० ग्रामीण भागात तुफान गाजली. शेतकऱ्यांनी देखील या गाडीला मोठी पसंती दिली.
२० रुपयांचं पेट्रोल टाकलं की महिनाभर गाडी फिरते असं एम ८० बाबत चर्चा होती, बजाजने तिला भारताबाहेर देखील एक्स्पोर्ट केलं होतं.
१९९० नंतर अनेक गाड्या भारतात आल्या, डॉ.मनमोहन सिंग जागतिकीकरण आणल्यानंतर परदेशी ब्रॅण्डसाठी भारतीय मार्केट ओपन झालं.
मात्र एम-८० च्या विक्रिवर याचा परिणाम झाला नाही. तब्बल १५ वर्षे ग्रामीण भारताच्या रस्त्यावर बजाज ही गाडी गाजत राहिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.