धनश्री भावसार-बगाडे
महेंद्र सिंग धोनी फक्त एक क्रिकेट पटू नाही तर तो एक बिझनेसमन पण आहे. त्यामुळेच तो देशातला सर्वात श्रीमंत खेळाडू आहे.
धोनीची रिती स्पोर्टस मॅनेजमेंट कंपनीत भागिदारी आहे. ही कंपनी जगातल्या अनेक दिग्गज आणि मोठ्या खेळाडूंचे मॅनेजमेंट करते. यात रोहित शर्मा, भुवनेश्वर कुमार यांच्या सह जगभरातले अनेक खेळाडू आहेत.
धोनीने २०१६ साली कपडे आणि फुटवेअर ब्रँड सेव्हन सुरु केली. ही कंपनी संपूर्ण धोनीच्या मालकीची आहे. फुटवेअर, फूड आणि बेवरेज मध्येही धोनीची गुंतवणूक आहे. धोनीने 7 in Brews मध्ये गुंतवणूक केली आहे. त्याने कॉप्टर ७ नावाचे एक चॉकलेट ब्रँड सुरु केले आहे.
फिटनेसला प्रोत्साहन देण्यासाठी एक चेन सुरु केली आहे. ज्याचे नाव धोनी स्पोर्ट्सफिट असे आहे. देशात याच्या २००हून अधिक फिटनेस चेन सुरु करण्यात आल्या आहेत.
क्रिकेट शिवाय अन्य खेळातही त्याला आवड आहे. यामुळेच त्याने हॉकी आणि फुटबॉल संघात गुंतवणूक केली आहे. इंडियन सुपर लीगमध्ये चेन्नईयिन एफसी हा फुटबॉल संघ धोनीच्या मालकीचा आहे. शिवाय हॉकीमध्ये रांची रेज या संघाचा तो सहमालक आहे.
महेंद्र सिंह धोनीने बेंगळुरू येथे एक शाळा देखील सुरु केली आहे. धोनीच्या शाळेचे नाव एमएस धोनी ग्लोबल स्कूल इंग्लिश मीडियम असे आहे. धोनीच्या शाळेसोबत दिग्गज सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टचा सहभाग आहे, जी प्रोग्रामिंग सारखे विषय शिकवते.
धोनी एंटरटेंमेंट म्हणून त्याचं प्रॉडक्शन हाउस आहे. प्रोटीन तयार करणाऱ्या शाका हॅरी या फूड कंपनीत गुंतवणूक आहे. धोनी अनेक हॉटेलचा मालक असून झारखंडमध्ये रांची येथे माही रेसिडेंसी नावाचे हॉटेल आहे.
२०११ साली धोनीने उत्तराखंड येथे एक शानदार घर खरेदी केले होते ज्याची किंमत १८ कोटी इतकी होती. त्याचे स्पोर्ट्स कार आणि बाइकचे कलेक्शन सर्वांना माहिती आहे.
टीव्ही जाहिरातीतून तो ३.५ ते ६ कोटी रुपये कमावतो. त्याच्याकडे वेगवेगळ्या ५४ कंपन्यांच्या जाहिराती आहेत.
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार असलेल्या धोनीला आयपीएलच्या एका हंगामासाठी १२ कोटी रुपये मिळतात. या शिवाय एंडोर्समेंट आणि पुरस्काराची रक्कम वेगळी मिळते.
धोनीने १० हून अधिक बिझनेस आणि स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. त्याची एकूण संपत्ती १ हजार ३० कोटी इतकी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.