Pranali Kodre
आयपीएल 2024 स्पर्धेत 21 व्या सामन्यात 7 एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्स संघाने गुजरात टायटन्स संघाविरुद्ध 33 धावांनी विजय मिळवला.
मात्र, याच सामन्यात लखनौचा फिरकीपटू मनीमरन सिद्धार्थ याच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला.
एम सिद्धार्थने गुजारात टायटन्सकडून शुभमन गिल आणि साई सुदर्शन फलंदाजी करत असताना पाचव्या षटकात तब्बल 3 नो-बॉल टाकले.
परंतु, असे असले तरी त्याच्या तीन नो-बॉलमुळे मिळालेल्या तिन्ही फ्री-हिटवर मात्र गिल आणि सुदर्शन यांना मोठा फटका खेळता आला नाही.
या षटकात तीन नो-बॉलसह सिद्धार्थने एकूण 9 चेंडू टाकले आणि 12 धावा दिल्या.
दरम्यान, सिद्धार्थ आयपीएलमध्ये एकाच षटकात 3 नो-बॉल टाकणारा पहिलाच फिरकी गोलंदाज ठरला आहे.
यापूर्वी अमित मिश्रा, अनिल कुंबळे (2010), योगेश नागर (2011) या फिरकीपटूंनी एकाच षटकात 2 नो-बॉल टाकले आहेत.
अमित मिश्राने 2009 आणि 2016 असे दोन हंगामात एकाच षटकात दोनदा नो-बॉल टाकण्याचा नकोसा विक्रम केला आहे.