माधुरीच्या फिटनेसचे काय आहे रहस्य?

Monika Lonkar –Kumbhar

माधुरी दीक्षित

'धकधक गर्ल' माधुरी दीक्षित तिच्या अप्रतिम सौंदर्यासाठी आणि फिटनेससाठी ओळखली जाते.

नृत्य

नृत्य हे माधुरीच्या फिटनेसचे सीक्रेट आहे. तिला नृत्य करायला प्रचंड आवडते.

आहार

माधुरी नृत्यासोबतच वर्कआऊट, योगा आणि आहाराची देखील खास काळजी घेते. तिला जपानी आहार आवडतो.

माधुरी तिच्या आहारात मिश्र भाज्या, टोफू, मशरूम इत्यादी गोष्टींचा समावेश करते. त्यासोबतच दररोज हर्बल चहा आणि नारळपाणी पिते.

माधुरी एकाच वेळी पोटभर जेवण करणे टाळते. त्याऐवजी, ती पाच ते सहा वेळा हलके जेवण करते.

कथ्थक आणि मॉर्निंग वॉक

माधुरी आठवड्यातून चार ते पाच दिवस कथ्थक करते, आणि न चुकता मॉर्निंग वॉक करते.

माधुरी तिचे पती डॉ.नेने यांच्यासोबत तिचे वर्कआऊट करतानाचे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

वयाच्या ५६ व्या वर्षी माधुरी सुंदर कशी दिसते? फॉलो करा तिचे स्किनकेअर रूटीन

Madhuri Dixit | esakal
येथे क्लिक करा.