Monika Lonkar –Kumbhar
अभिनेत्री माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने हे सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असतात. ते सतत आरोग्य आणि डाएटबद्दल माहिती देतात.
काही दिवसांपूर्वीच डॉ. नेनेंनी एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात त्यांनी वजन कमी कसे करायचे? याबद्दल सांगितले आहे.
नेने म्हणाले की, वजन कमी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या खाण्याच्या सवयी आणि न्यूट्रिशिएनवर लक्ष द्यावे लागेल.
नेने म्हणाले की गरजेपेक्षा कमी आहार घ्या, पोट भरेपर्यंत खाऊ नका. डाएट प्रामुख्याने पाळावे त्यानंतर मग वर्कआऊट, व्यायाम इत्यादी गोष्टींवर लक्ष द्यावे.
वजन वाढलेल्या लोकांनी त्यांचे आताचे वजन किती? आहार कसा आहे? तुम्ही व्यायाम कोणता आणि किती वेळ करता? याची नोंद ठेवावी.
तुम्ही काय खाताय? याचा थेट परिणाम तुमच्या वजनावर होतो. वजन कमी करण्यात आहार महत्वाची भूमिका बजावते.
कॅलरी इंटेक आणि कॅलरी बर्नचे गणित नेहमी डोक्यात ठेवावे. कारण, वजन कमी करण्याचे हे महत्वाचे सूत्र आहे.