Anuradha Vipat
माधुरी दीक्षितच्या लग्नाला नुकतीच २५ वर्षे पूर्ण झाली आहेत
डॉ. नेने आणि माधुरी या दोघांकडे नेहमीच आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं.
आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत माधुरीला त्यांच्या लग्नाबद्दल तसेच सुखी संसाराचं रहस्य काय असा प्रश्न विचारण्यात आला.
यावर माधुरी म्हणाली, कोणत्याही नात्यात समजूतदारपणा महत्त्वाचा असतो.
पुढे माधुरी म्हणाली, तुम्हाला काही गोष्टी समोरच्याला द्यावा लागतात, तर काही गोष्टी आपल्या जोडीदाराकडून शिकाव्या लागतात.
पुढे माधुरी म्हणाली,लग्न किंवा रिलेशनशिप सांभाळणं म्हणजे ‘गिव्ह अँड टेक’सारखं आहे. दोघांनी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे.
सुखी वैवाहिक आयुष्याबद्दल माधुरी म्हणाली, प्रत्येक गोष्टीची जशी सकारात्मक बाजू आहे तशी नकारात्मक बाजू देखील आहे. या सगळ्या बाबी आपण समजून घेणं आवश्यक असतं.