Anuradha Vipat
माधुरी दीक्षितने ९०च्या दशकात बॉलीवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली
गेल्यावर्षी १२ मार्च २०२३ रोजी माधुरीची आई स्नेहलता यांचं मुंबईतील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झालं.
आईला दूर जाऊन आज एक वर्ष पूर्ण झाल्याने माधुरीने सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केली आहे.
आई तुला जाऊन आज वर्ष झालं. तुझ्या जाण्याचं दु:ख कायम मनात राहणार. आई, तुझी आठवण सदैव आम्हाला येत असते. असं माधूरीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे
तसेच आमचं सर्वांचं तुझ्यावर मनापासून प्रेम असून प्रत्येक क्षणाला तुझा सहवास आम्हाला जाणवत राहतो. आमच्या आठवणींमध्ये तू कायम राहणार आहेस.” अशी भावुक पोस्ट माधुरीने आईच्या आठवणीत शेअर केली आहे.
माधुरी तिच्या सोशल मीडियावर नेहमीच आईबरोबरचे खास फोटो शेअर करायची