Anuradha Vipat
मराठमोळी माधुरी दीक्षित बॉलीवूडची ‘धकधक गर्ल’ झाली आहे
आता सिनेविश्वात ४० वर्षे पूर्ण होणार असल्याने माधुरी सध्या USA दौऱ्यावर आहे.
USA दौरा सुरू करण्यापूर्वी न्यू जर्सी येथे माधुरीने नुकतीच पत्रकार परिषद घेतली.
यावेळी माधुरीला पत्रकारांनी तुम्ही डॉ. श्रीराम नेने यांच्याशी संवाद साधताना कधी बॉलीवूड चित्रपटातील गाणी गायली आहेत का किंवा चित्रपटातले संवाद वापरले आहेत का?असा प्रश्न विचारला.
यावर माधुरी म्हणाली, माझ्या नवऱ्याला हिंदी नीट बोलता येत नाही. तो मराठी बोलू शकतो पण, हिंदी नाही त्यामुळे मी असं गाणं किंवा संवाद त्याच्यासमोर कधीच बोलली नाहीये
माधुरीला ९० च्या दशकातील सुपरस्टार अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं
माधुरी आता मनोरंजनविश्वात सक्रिय झाली आहे