महाराष्ट्रातील करोडपतींच गाव माहितेय का?

राहुल शेळके

करोडपतींचे गाव

महाराष्ट्रात एक गाव आहे ज्याला करोडपतींचे गाव म्हणतात. या गावाची एकूण लोकसंख्या 1250 पेक्षा जास्त आहे. गावात 305 कुटुंबे राहतात.

maharashtra richest village | Sakal

त्यापैकी 80 कुटुंबे करोडपती आहेत. 50 कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.

maharashtra richest village | Sakal

हे गाव आहे अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार. या गावाला महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत गाव म्हटले जाते.

maharashtra richest village | Sakal

आता तुम्ही विचार करत असाल की या गावातील लोक एकतर गर्भ श्रीमंत असतील किंवा व्यापारी असतील.

maharashtra richest village | Sakal

उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत शेती

पण, गमतीची गोष्ट म्हणजे गावातील लोकांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत शेती आहे. इथल्या लोकांनी मिळून शेतीवर भर दिला आणि गावाचा जीडीपी वाढवला.

maharashtra richest village | Sakal

इथल्या लोकांनी मिळून शेतीवर भर दिला आणि गावाचा जीडीपी वाढवला.

maharashtra richest village | Sakal

सर्वत्र गरिबी होती

हिवरेबाजार गावात एक काळ असा होता की बहुतांश लोकांवर उपासमारीची वेळ आली होती. गावात सर्वत्र गरिबी पसरली होती. त्यामुळे गावातील लोक उपजीविकेच्या शोधात हिवरे बाजारातून शहरांकडे जाऊ लागले.

maharashtra richest village | Sakal

1990 मध्ये येथील 90 टक्के कुटुंबे गरीब होती यावरून वाईट परिस्थितीचा अंदाज लावता येतो. या गावाला 80 आणि 90 च्या दशकात भीषण दुष्काळ पडला होता.

maharashtra richest village | Sakal

परिस्थिती इतकी बिकट झाली की पिण्यासाठीही पाणी राहिले नाही. त्यावेळी गावात 93 विहिरी होत्या.

maharashtra richest village | Sakal

भूजल पातळीही 110 फुटांनी खाली गेली होती. काही लोक कुटुंबासह गाव सोडून गेले. मग या गावातील लोकांनी वन व्यवस्थापन करायचे ठरवले.

maharashtra richest village | Sakal

वन व्यवस्थापन समिती

दुष्काळाचा सामना करण्यासाठी 1990 मध्ये संयुक्त वन व्यवस्थापन समिती या समितीची स्थापना करण्यात आली. त्याअंतर्गत गावात विहिरी खोदणे, वृक्षारोपण करण्याचे काम श्रमदानातून करण्यात आले.

maharashtra richest village | Sakal

या कामाला महाराष्ट्र रोजगार हमी योजनेंतर्गत निधी देण्यात आला. त्यानंतर 1994-95 मध्ये आदर्श ग्राम योजना सुरू झाल्यानंतर या कामाला गती मिळाली.

maharashtra richest village | Sakal

यानंतर समितीने हिवरे गावात जास्त पाणी लागणाऱ्या पिकांच्या पेरणीवर बंदी घातली. लोकांच्या मेहनतीचे आणि एकजुटीचे फळ म्हणजे आता गावात 300 हून अधिक विहिरी आहेत.

maharashtra richest village | Sakal

गावातील सर्व कुटुंबे शेतीतून उत्पन्न मिळवतात. गावातील लोक भाजीपाला पिकवून दरवर्षी भरघोस उत्पन्न मिळवतात. एवढेच नाही तर दरवर्षी त्यांचे उत्पन्नही वाढत आहे.

maharashtra richest village | Sakal

सरासरी उत्पन्न 20 पटींनी वाढले

गेल्या 20 वर्षांत गावातील लोकांचे सरासरी उत्पन्न 20 पटींनी वाढले आहे. हिवरे गावातील लोकांच्या एकजुटीमुळे गरिबी संपली. त्यामुळे लोकांचे शहरांकडे स्थलांतर थांबले.

maharashtra richest village | Sakal

आता लोक हिवरे बाजार गावात राहून शेती करतात. गाव सोडून गेलेले लोकही आता परतले आहेत.

maharashtra richest village | Sakal

हिवरे बाजार गावचे सरपंच पोपट राव पवार हे देशातील अशा मोजक्या लोकांमध्ये गणले जातात, ज्यांच्यामुळे गावाची स्थिती बदलली.

maharashtra richest village | Sakal

हिवरेबाजार गावातील लोकही त्यांच्याकडून शिकून शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत. त्यामुळे त्यांचे उत्पन्नही वाढत आहे.

maharashtra richest village | Sakal

1970 च्या दशकात हिवरे बाजार हे गाव हिंद केसरी पैलवानांसाठी ओळखले जात होते. पुढे परिस्थिती बिघडत गेली. मात्र, आता परिस्थिती पुन्हा बदलली आहे.

maharashtra richest village | Sakal

जास्त भूक लागल्यानंतर डोकं का दुखतं? कधी विचार केलाय का..

येथे क्लिक करा