Monika Lonkar –Kumbhar
हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला फार महत्व आहे. ही महाशिवरात्री देशात मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरी केली जाते.
आज महाशिवरात्री आहे. त्यानिमित्ताने भगवान शंकाराच्या शिवलिंगाची आणि देवी पार्वतीची विधिवत पूजा केली जाते.
फाल्गुन महिन्यात येणाऱ्या महाशिवरात्रीला विशेष महत्व आहे. या दिवशी महादेवाला रूद्राभिषेक करण्याचीही परंपरा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी दान करणे शुभ मानले जाते.आज महाशिवरात्रीनिमित्त कोणत्या गोष्टींचे दान करणे शुभ आहे? ते आपण जाणून घेऊयात.
महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर तूपाचा अभिषेक करणे, शुभ मानले जाते. महादेवाला तूपाचा अभिषेक केल्यानंतर तूपाचे दान ही करावे. महाशिवरात्रीला तूपाचे दान केल्याने घरातील संकटे टळतात असे मानले जाते.
तसेच, घरातील नकारात्मकता बाहेर जाते आणि घरात सकारात्मक वातावरण तयार होते. त्यामुळे, महाशिवरात्रीला तूप दान अवश्य करा.
महाशिवरात्रीच्या दिवशी तीळाचे दान अवश्य करावे. या दिवशी शंभू महादेवाच्या शिवलिंगावर तीळ अर्पण केल्याने पितृदोष दूर होतो. तसेच, पित्रे प्रसन्न होतात आणि त्यांची आपल्यावर कृपा राहते.
महाशिवरात्रीच्या दिवशी शंभू महादेवाला दूधाचा अभिषेक जरूर करावा. शिवलिंगाला दूध अर्पण करण्यासोबतच या दूधाचे दान अवश्य करावे.
आजच्या दिवशी दूध दान केल्याने मानसिक शांती मिळते आणि घरात सूख-शांती नांदते. महादेव-पार्वतीचा शुभ आशीर्वाद मिळतो, अशी धार्मिक मान्यता आहे.