संतोष कानडे
वंचितांसाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या महात्मा गांधींनी थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघितला का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल
त्याचं उत्तर हो आहे. महात्मा गांधी यांनी आयुष्यात केवळ एकच चित्रपट बघितला तोही थिएटरमध्ये
महात्मा गांधींना सिनेमांबद्दल फारकाही उत्सुकता किंवा रस नव्हता
अभ्यासानुसार महात्मा गांधी यांनी आपल्या जीवनात रामराज्य नावाचा चित्रपट बघितला
गांधींनी पाहिलेला हाच पहिला आणि शेवटचा सिनेमा होता
रामराज्य हा सिनेमा १९४३ मध्ये प्रदर्शित झाला होता, दिग्दर्शक होते विजय भट्ट
विजय भट्ट यांच्या आग्रहाखातर बापूंनी थिएटरमध्ये जाऊन रामराज्य सिनेमा बघितला
परंतु गांधींनी हा चित्रपट पूर्ण बघिताल नाही. तो मध्येच सोडून ते सिनेमागृहातून बाहेर पडले होते
त्यांनंतर त्यांनी कधीच सिनेमागृहात जाऊन कोणताच चित्रपट बघिता नाही
मात्र जगभरात महात्मा गांधींवर अनेक चित्रपट आणि कलाकृती बनल्या