सकाळ डिजिटल टीम
मार्च महिना संपला की, गावोगावच्या यात्रेची चाहूल लागते. यात्रेचा सण उत्सव म्हणजे आपल्या माणसांना एकत्र करण्याचा एक सोहळाच असतो.
असाच सोहळा रंगतो, वाढतो आणि त्यातून एक समतेचा संदेश जातो तो म्हणजे बिरोबा देवाची यात्रा!
रात्री उशिरा सातारा जिल्ह्यातील विकासनगरमधील बिरोबा देवाच्या यात्रेला महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी उपस्थिती दर्शवली.
यावेळी त्यांनी बिरोबा देवाचे मनोभावे दर्शन घेत या महाराष्ट्राच्या आणि सातारच्या स्वाभिमानाच्या लढाईत बळ मिळो, अशी प्रार्थना केली.
आमदार शशिकांत शिंदे यांना शरद पवार यांनी उमेदवारी जाहीर केली आहे.
यात्रेनिमित्त ग्रामस्थांनी धनगर समाजाचे प्रतीक असलेली घोंगडी - काठी - भंडारा लावून शिंदे यांचा सन्मान केला.
यावेळी धनगर बांधवांशी संवाद साधत असताना समाज बांधवांच्या विविध प्रश्नांसाठी मी नक्कीच आवाज उठवेन, असा विश्वासही शिंदेंनी या निमित्ताने दिला.