सकाळ डिजिटल टीम
शिंदे साहेब, तुम आगे बढो... हम तुम्हारे साथ है... अशा घोषणा देत आमदार शशिकांत शिंदे यांचं जिल्ह्याच्या सीमेवर शिंदेवाडीत जल्लोषात स्वागत करण्यात आलं.
यानिमित्ताने महाविकास आघाडीतील घटक पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीही शक्तिप्रदर्शन केलं.
या वेळी ‘आपला माणूस, शशिकांत शिंदे’ असे लिहिलेले फ्लेक्स सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
माझी स्पर्धा इतर कोणत्याही उमेदवारासोबत नसून तत्त्वांसोबत असल्याचे शशिकांत शिंदेंनी यावेळी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीचे सातारा लोकसभेचे उमेदवार म्हणून आमदार शशिकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ठिकठिकाणी त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.
वेळे ते आनेवाडी दरम्यान प्रत्येक गावाच्या वेशीवर शशिकांत शिंदेंचं कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शन करत जोरदार स्वागत केलं. (फोटो : प्रमोद इंगळे)