सकाळ डिजिटल टीम
ढोलताशांचा गजर, हलगीचा कडकडाट, टाळमृदंगाचा गजर आणि हजारो समर्थकांनी दिलेल्या ‘एक नेता एक आवाज... उदयनमहाराज... उदयनमहाराज’ या घोषणांनी संपूर्ण सातारा उदयनराजेमय बनला.
निमित्त होते खासदार उदयनराजे भोसले यांचा सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे.
यावेळी काढलेल्या महारॅलीद्वारे उदयनराजेंनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.
महायुतीचे उमेदवार उदयनराजेंचा अर्ज भरण्यासाठी गुरुवारी गांधी मैदानावरून निघालेली महारॅली पोवई नाका येथे आल्यानंतर कार्यकर्त्यांच्या झालेल्या गर्दीचे ड्रोनद्वारे घेतलेले छायाचित्र.
उदयनराजे भोसले व शिवेंद्रसिंहराजे भोसले बैलगाडीचे सारथ्य करत गांधी मैदानावर महारॅलीसाठी आले.
महारॅलीत हातात फलक घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला.
पोवई नाका येथे छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घातल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना वज्रमूठ करत एकीचा संदेश दिला. (फोटो : प्रमोद इंगळे)