Anuradha Vipat
सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आपलं मत मांडलं आहे
मुलाखतीत महेश मांजरेकर म्हणाले, “मला या गोष्टीचा भयंकर राग येतो. राग यायलाही हवा. लोक म्हणतात ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करा.कोणी हक्क दिला तुम्हाला? मी काही तुमच्याबद्दल वैयक्तिक बोललो आहे का?
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले,मी एखादी पोस्ट केली की माझी आई, वडील, माझी मुलगी, बायकोला बोलायचा हक्क कोणाला देत नाही. मी चवताळलेल्या माणसासारखा शोधून कानफटवेन
पुढे महेश मांजरेकर म्हणाले, “तुम्ही माझ्या कामावर बोला, पण दरवेळी माझ्या आईला का बोलता?
तसेच त्यांनी ट्रोलिंग रोखण्यासाठी कायदा करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.
महेश मांजरेकर सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन ट्रोल होतात