Saisimran Ghashi
राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली. या योजनेच्या माध्यमातून सरकार पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देणार आहे.
पण या योजनेचे अर्ज भरण्यासाठी महिलांना लांब रांगांमध्ये थांबावे लागत आहे.या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत आहे.
अश्यात कोणत्याही रांगेत न थांबता तुम्ही या योजनेपासून 'नारीशक्ती दूत' ॲपवरुन ऑनलाईन अर्ज भरू शकता.याच्या स्टेप्स पुढील प्रमाणे आहेत..
सुरवातीला प्ले स्टोअरवरून ‘नारीशक्ती दूत’ ॲप डाऊनलोड करा.ॲप उघडल्यावर मोबाईल क्रमांक, ई-मेल टाकून त्याखाली आपण कोणत्या गटात मोडतो (सामान्य महिला, गृहिणी असे) ते टाका.
ते सबमिट केल्यावर ओटीपी येईल, तो त्याठिकाणी टाका म्हणजे तुमचे प्रोफाइल तयार होईल.
प्रोफाइल तयार झाल्यावर खालील बाजूला नारीशक्ती दूत, योजना, यापूर्वी केलेले अर्ज व प्रोफाइल असे पर्याय आहेत, त्यापैकी ‘नारीशक्ती दूत’वर क्लिक करा.
त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा पर्याय दिसेल आणि तो उघडून त्यावरील माहिती भरा.
अर्जातील संपूर्ण वैयक्तिक माहिती भरल्यावर आधारकार्ड, रहिवासी किंवा जन्म प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र किंवा १५ वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड अपलोड करावे लागेल.
शेवटी अर्जदाराचे हमीपत्र देखील अपलोड करावे लागणार असून त्यासाठी हमीपत्र डाऊनलोड करून ते भरून ठेवा म्हणजे त्याचा फोटो अपलोड करता येईल.
सर्वात शेवटी फोटोचा पर्याय असून आपला स्वत:चा (लाभार्थी महिला) फोटो काढून त्यावर अपलोड करून अर्ज सबमिट करा आणि त्याचा स्क्रिन शॉट काढून ठेवा.
अश्याप्रकारे लाभार्थी महिला नारीशक्ती दूत ॲप वापरुन मोबाईल वरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज कोणत्याही अडचणीविना भरू शकतात.