Monika Lonkar –Kumbhar
मकर संक्रांतीचा सण उद्या (१५ जानेवारीला) देशात साजरा केला जाणार आहे.
संक्रांतीपूर्वी आज देशात भोगी आणि लोहरीचा उत्साह पहायला मिळत आहे.
मकर संक्रांतीनिमित्त महिलांना साडी, ज्वेलरी, हलव्याचे दागिने, हेअरस्टाईल आणि मेकअपची खास तयारी करावी लागते.
हिवाळ्यात पारंपारिक लूकसोबत जास्तीचा डार्क मेकअप करणे हे थोडे कठीण असते. मात्र, जर तुम्हाला नैसर्गिक लूक हवा असेल तर ब्लशचा वापर करायला विसरू नका.
चेहऱ्यावर ब्लशचा वापर केल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर रेग्युलर फाऊंडेशनचा टच द्या.
पारंपारिक साडी किंवा अन्य आऊटफीट्सवर तुम्ही मॅट लूक निवडू शकता. कारण, पारंपारिक लूकवर हा मॅट मेकअप अधिक उठून दिसतो. मॅट मेकअप लूकमुळे तुमचा मकर संक्रांती लूक हा परफेक्ट दिसण्यास मदत होईल.
पारंपारिक साडीवर डार्क लिपस्टिक नेहमीच शोभून दिसते. संक्रांतीच्या सणासाठी तुम्ही काळ्या रंगाची साडी नेसा किंवा इतर कोणत्याही रंगाची नेसा. त्यावर डार्क लिपस्टिक लावायला विसरू नका.
संक्रांतीला पारंपारिक साडीवर मॅच होणाऱ्या शिमरी आयशॅडोजचा वापर नक्कीच करू शकता. सिल्वर किंवा गोल्ड रंगाचे शिमरी आयशॅडोज पारंपारिक लूकवर अधिक खुलून दिसतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.