उन्हाळ्यात घरच्या घरी झटपट बनवा थंडगार मलाई कुल्फी Ice Cream Recipe

रुपेश नामदास

साहित्य- दूध-२ लिटर, साखर-१५० ग्रॅम, फ्रेश क्रिम-१ वाटी, मिल्क पावडर-१ वाटी, सुकामेवा आवडीनुसार, वेलची पावडर चवीनुसार, फ्लेवर आवडीनुसार

ice cream recipe | esakal

कृती

प्रथम मंद आचेवर दूध १५-२० मिनिट चांगले उकळून घ्यावे.

ice cream recipe | esakal

फ्रेश क्रिम, अर्धा कप दूध आणि मिल्क पावडर एकत्र करुन त्यापासून मावा तयार करुन घ्या. किंवा खवाही वापरु शकता.

ice cream recipe | esakal

उकळलेल्या दूधात मावा, साखर आणि सुकामेव्याचे काप घालून गाठी होणार नाहीत असे हलवत मध्यम आचेवर ठेवा.

ice cream recipe | esakal

या मिश्रणात वेलची पावडर किंवा आवडता फ्लेवर घाला.

ice cream recipe | esakal

मिश्रण पूर्ण गार होऊ द्यावे. मावा, सुकामेवा आणि दूध आटवल्यामुळे हे मिश्रण घट्टसर होईल.

ice cream recipe | esakal

कुल्फीच्या साच्यात किंवा लहान आकाराच्या ग्लासमध्ये हे घट्टसर मिश्रण घाला आणि त्यात काड्या घाला.

ice cream recipe | esakal

हे मिश्रण घातलेले साचे किंवा ग्लास ६ ते ७ तासांसाठी फ्रिजरमध्ये ठेवा. त्यानंतर साचे किंवा ग्लास साध्या पाण्यात बुडवून त्यातील कुल्फी काढून घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ice cream recipe | esakal