Aishwarya Musale
आजच्या अस्वस्थ जीवनशैलीमुळे अनेक आजारांचा धोका निर्माण झाला आहे.
यातही एक मोठी समस्या म्हणजे शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता, ज्यामुळे शरीरात थकवा आणि सुस्ती येते आणि रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते.
शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी हिरव्या भाज्या, पालक, शिमला मिरची आणि ब्रोकोली खावीत.
यामध्ये जीवनसत्त्व ए, बी 12, मॅग्नेशियम असे अनेक पोषक घटक असतात, जे शरीरातील हिमोग्लोबिन वाढविण्यास मदत करतात.
डाळिंबामध्ये प्रथिने, जीवनसत्त्व ए, सी आणि ई, फायबर, कार्बोहायड्रेट्स आणि भरपूर प्रमाणात लोह असते.
अशावेळी हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे खूप फायदेशीर ठरते. त्यामुळे रक्ताची कमतरता भासल्यास त्याचा रस पिण्याचा सल्लाही डॉक्टर देतात.
शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठीही खजूर खूप प्रभावी आहे, पण जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर त्याऐवजी भोपळ्याच्या बियांचे सेवन करू शकता.
हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यात बीट कुणापेक्षा कमी नाही. यात लोहाचा खजिना असतो. तसेच बीट खाल्ल्यास तुमची पचनशक्तीही सुधारेल.