पावसाळ्यात बनवा 'हा' गरमा-गरम व्हेज रस्सा! सर्दी-खोकल्यापासून मिळेल आराम

सकाळ डिजिटल टीम

पावसाळा गार वातावरणासोबतच इतर आजारही घेऊन येतो. जसे की सर्दी-खोकला-ताप.

आज आम्ही तुमच्यासाठी हॉट वेज ब्रोथ सूप बनवण्याची रेसिपी घेऊन आलो आहोत. ज्यामुळे तुम्हाला सर्दी-खोकल्यापासून आराम मिळेल.

हे सूप अनेक प्रकारच्या भाज्या आणि औषधी वनस्पतींच्या मदतीने बनवले जाते. जे तुम्हाला पावसाळ्यात तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यास मदत करते.

सूप बनवण्यासाठी लागणारे साहित्य

कांदा - 2 बारीक चिरून, हिरवी मिरची - 3 बारीक चिरून, लसूण, 4-5 लवंगा, ब्रोकोली- 1, गाजर - 2, ओवा -1 चमचा, बडीशेप - 2 टिस्पून, ऑलिव्ह ऑईल- 2 टिस्पून, पाणी - 4 ग्लास

हॉट वेज ब्रोथ सूप बनवण्यासाठी प्रथम कढईत तेल गरम करा. यानंतर त्यात लसूण घालून 2 मिनिटे परतून घ्या.

नंतर त्यात चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परता. आता त्यात सर्व चिरलेल्या भाज्या आणि पाणी घाला.

नंतर ते सुमारे 30 मिनिटे चांगले उकळवा. यानंतर मीठ आणि हलकी काळी मिरी घालून मिक्स करा.

तुमचा चविष्ट आणि आरोग्यदायी गरम व्हेज सूप तयार आहे.